देणगी विभाग


प्रिय मित्र

सप्रेम नमस्कार, स्वागत आणि विशेष आभार

ई साहित्यच्या वेबवरील या देणगी पेजला सहसा कोणी भॆट देत नाही. म्हणून तुमचं खास स्वागत. सध्या सर्वत्र लुबाडण्याची आणि ओरबाडण्याची स्पर्धा चालू असता आपण स्वतःहून देणगी देण्याची ईच्छा मनात आणलीत हेच खूप मोठे. आपले मनापासून आभार मानतो. हे काम सुरू रहावे असे आपल्याला मनापासून वाटत असेल तर आपण ई साहित्यला देणगी देऊन बंद होण्यापासून वाचवू शकता. अगदी दहा (रु.१०) पासून ते कितीही देणगी देऊ शकता. आपण वाचलेल्या पुस्तकांच्या प्रमाणात आपण दर पुस्तकामागे स्वेच्छेने दहा रुपये दिले तरी हे काम वाढत जाईल. आपण दिलेला प्रत्येक रुपया मराठी साहित्याच्या वाढीसाठी सत्कारणी लागेल याची खात्री बाळगा.

ई साहित्य प्रतिष्ठान ही बिगरसरकारी स्वतंत्र संस्था आहे. कोणत्याही उद्योगसमूहाशी निगडित नसलेली. कोणत्याही पक्ष वा संघटनेशी न बांधलेली. कोणत्याही विशिष्ट विचारसरणीशी न बांधलेली. कोणतेही फ़ंडिंग नसलेली. व्यक्तीगत हौशी लोकांची संस्था. ई साहित्य प्रतिष्ठानची बांधिलकी फ़क्त मराठी भाषा व मराठी वाचक/लेखक यांच्याशी आहे. आजवर हजारो पुस्तकं तयार करून लाखो वाचकांपर्यंत ई मेल द्वारे विनामूल्य पोचवण्यात आलेला खर्च या संस्थेच्या सभासदांनी स्वतःच उचलला.

ई साहित्य प्रतिष्ठान गेली तेरा वर्षं वाचकांना विनामूल्य पुस्तके देते. वेबसाइट्स, ई मेल्स, व्हाट्सप, ऍप्प अशा सर्व मार्गांनी हे काम सुरू आहे. अखंड. विनारुकावट. विनाजाहिराती. पैशाच्या मागणी विना. यात सर्वात मोलाचे योगदान अर्थातच ई साहित्यच्या लेखकांचे. इतकी दर्जेदार वाचनीय पुस्तके लाखो वाचकांना विनामूल्य देणारे आमचे लेखक खरेच धन्य. त्यांच्याशिवाय हे अभियान चाललेच नसते. पण तरीही या कामाला इतर खर्च तर येतातच ना? पुस्तक निर्मिती, कंप्युटर्स, इंटरनेट, वेबसाईट, App, नवनवीन प्रयोग, पुस्तक वितरण, जाहिरात या सर्वांना खर्च येतो. ते कसे भागतात? स्वतः कार्यकर्ते कुठवर पुरे पडणार?

या कामाला आजवर कधी पैसे कमी पडले नाहीत. पैशामुळे हे थांबले नाही. याचे श्रेय जाते आमच्या देणगीदारांना. पण आता हे काम फ़ार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आणि हे काम पुढेही सुरू रहावे ही आपली मनोमन इच्छा असेल तर या कामाला देणगी द्यायला हवीच. नाही का? मग ती कितीही असो. अगदी दहा रुपयांपासून कितीही देणगी द्या. हे कार्य बंद पडू नये असे जर मनोमन वाटत असेल तर द्या. आपली देणगी या कामाला आर्थिक बळ तर देतेच पण नैतिक पाठबळही देते हेही लक्षात घ्या. देणगी देण्यासाठी अकाउंट.

A/C Name : E Sahity Pratishthan
A/C No. 32631252535
Account type : Current Account
Bank :State Bank of India
​IFSC : SBIN0005354

रु. २००० हून अधिक देणगी देणार्‍यांना आम्ही ई साहित्यची ११०० पुस्तकांची आकर्षक पेनड्राईव्ह आभारप्रदर्शक सदिच्छा भेट म्हणून देतो. ही पेन-ड्राईव्ह मोबाईलला जोडून आपण पुस्तके वाचू शकता. ही पेन ड्राईव्ह कितीही कंप्युटर व मोबाईलना जोडता येते. हिचा वापर करून आपण ई वाचनालय सुरू करू शकता.

आमच्या देणगीदारांची नावे या पेजवर जाहीर करतो.

धन्यवाद
टीम ई साहित्य प्रतिष्ठान

गेल्या एक वर्षातील देणगीदारांची यादी